नवी दिल्ली – जिनिव्हामधील भारताच्या स्थायी मोहिमेचे प्रथम सचिवपदी नियुक्ती झालेले पवनकुमार बढे यांनी मानवाधिकार परिषदेच्या 45 व्या सत्रात बोलतांना पाकिस्तान, तुर्कस्तानचे दावे खोडून काढतांना पाकिस्तान दहशतवादाचा केंद्रबिंदू असल्याचा प्रहार केल्याने रावेर तालुक्यातील चिनावलपुत्र पवनकुमार बढे यांनी तर पाकिस्तान नादानीमें आगे ना बढे! असा टोलाही लगावला आहे.

दरम्यान बढे म्हणाले की, भारताची प्रतिमा मलिन करण्यासाठी असत्य आणि तथ्यहिन दावे करण्याची पाकिस्तानची जुनी खोड आहे. भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप केल्यावरून पाकिस्तान, तुर्कस्तान आणि इस्लामिक देशांची संघटना असलेल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक (ओआयसी) चा भारताने संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवाधिकार परिषदेमध्ये खरमरीत शब्दांत समाचार घेतला.
भारतच नव्हे तर इतर कोणालाही पाकिस्तानसारख्या देशाकडून मानवाधिकाराबाबत प्रवचन ऐकण्याची गरज नाही. वांशिक आणि धार्मिक अल्पसंख्याकांचा छळ करणारा पाकिस्तान दहशतवादाचा केंद्रबिंदू आहे.एवढेच नव्हे तर सयुंक्त राष्ट्र संघाने प्रतिबंध घातलेल्यांना पाकिस्तानकडून पेन्शन दिली जाते.आणि त्यांचे पंतप्रधान जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरविण्यासाठी हजारो दहशतवाद्यांना प्रशिक्षित केल्याचे सांगतात.म्हणूनच या संस्था दहशतवादी संघटनाविरोधात कारवाई न करण्यावरून पाकिस्तानला फटकारतात, असा टोलाही पवनकुमार बढे यांनी लगावला.पाकिस्तान भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करून मानवाधिकार परिषदेच्या व्यासपीठाचा गैरवापर करत असल्याची तोफही बढे यांनी डागली.







