
वडती ता. चोपडा( प्रतिनिधी) :–चोपडा तालुक्यातील ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ या कार्यक्रमाची सुरुवात धानोरा या गावातून करण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमंदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या
हस्ते व माजी आमंदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
कोविड -19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत असून कोरोनावर हमखास असा तोडगा सापडून त्याच्यावर संपूर्ण नियंत्रण होई पर्यंत मास्कचा उपयोग, सुरक्षित अंतर, निर्जतुकी करणाचा वापर याच्यापलीकडे जाऊन आता वैयक्तिक, कौटुंबिक तसेच सार्वजनिक आयुष्यात नवीन बदलांचा अवलंब करणे आवश्यक झाले आहे. अशा बदलाचा स्वीकार करुन त्या माध्यमातून कोरोनावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ ही मोहीम 15 सप्टेंबर पासून राबविण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण राज्यभरात ही मोहीम राबविली जाणार आहे . याच पार्श्वभूमिवर चोपडा तालुक्यात आ. सौ. लताताई सोनवणे यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबविला जात आहे.
यात आमदार निधीतून कोविडसाठी ५० लाख रुपये मंजूर करून आणले. यातून ५००० अँटी रॅपिड किट प्राप्त झाले. असून माजी आमदार चंद्रकात सोनवणे यांच्या उपस्थितीत धानोरा येथून या योजनेचा प्रारंभ करण्यात आला.
यावेळी तहसीलदार अनिल गावित , गटविकास अधिकारी बी. एस. कासोदे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदिप लासुरकर, धानोरा वैद्यकीय अधिकारी उमेश कवडीवाले, माजी उपसभापती माणिकचंद महाजन, नवनियुक्त प्रशासक जितेंद्र पाटील, युवा सेना प्रमुख गोपाल चौधरी, शिक्षक सेना अध्यक्ष चंद्रशेखर साळुंके, पंचायत समिती सदस्या कल्पना पाटील, सुर्यकांत खैरनार, पी. आर. माळी सर, जावेद शेख अडावद, प्रवीण सोनवणे ,राजू पाटील, विकास महाजन, राजू भालेराव, राजेंद्र साळुंखे, किर्ती पाटील, सूर्यभान पाटील सर, तलाठी खुशबू तडवी, प्रभारी ग्रामसेवक सुकदेव पारधी, विकासो चेअरमन अनिल महाजन, परीसरातील सरंपच, उपसरपंच, अंगणवाडी सेविका, मदतनिस, सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होती.







