पारोळा( प्रतिनिधी)– पारोळा शहरातील व तालुक्यातील वाढती कोरोणा रुग्णांची संख्या पाहता बाहेरगावी कोविड हॉस्पिटल ला जावे लागत होते याची दखल घेऊन डॉ. सचिन कटेकर हे पारोळा शहरातही कोविंड हॉस्पिटल सुरु व्हावे यासाठी प्रयत्नशील होते , आणि त्याचाच एक भाग म्हणून आज डॉ सचिन कटेकर यांच्या प्रयत्नाने जीवनधारा कोविड


हॉस्पिटल चा शुभारंभ नगराध्यक्ष करण पवार यांच्या हस्ते करण्यात आले आहे. हे हॉस्पिटल विजया लॉन्स चोरवड रोड, पारोळा येथे सुरू झाले आहे. यावेळी पारोळा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री. कानडे ,वैद्यकीय अधिकारी कॉटेज हस्पिटल चे डॉ योगेश साळुंके,नगरसेवक पी जी पाटील,जीवनधारा कोविड सेंटर चे संचालक नाशिक चें डॉ भालेराव, डॉ सचिन कटेकर, डॉ हेमंत मराठे, डॉ सुनील पाटील इतर मान्यवर उपस्थित होते.
या हॉस्पिटल मध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर उपलब्ध असल्यामुळे पारोळा शहरातील व तालुक्यातील रुग्णांना याचा फायदा होणार आहे.







