जळगाव (विशेष प्रतिनिधी) – वॉटरग्रेस कंपनीविषयी सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील हे पुराव्यानिशी तक्रारी करीत असतांना देखिल मनपाचे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने नागरीकांमध्ये आश्चर्य व संताप व्यक्त केला जात आहे.याबाबत मनपाचे आयुक्त सतिश कुलकर्णी हे माध्यमांशी बोलण्यास तयार नाही.त्यामुळे सफाईच्या ठेक्यात नेमके काय रहस्य दडले आहे? मनपा प्रशासन आणि सत्ताधारी भाजपा यांच्यात सफाईच्या ठेक्यावरून काहि संबध आहेत काय? तसेच विरोध पक्ष असलेला शिवसेना व तीन सदस्य असलेला आणि पहिल्यांदाच मनपात शिरकाव केलेला एमआयएम पक्ष यावर काहीच बोलत नसल्याने विरोधकांना देखिल याबाबत गांभिर्य राहिलेले नाही काय? असे प्रश्न निर्माण झाले आहे.
जळगाव शहरात साफसफाई करण्यासाठी नोव्हेंबर महिन्यामध्ये काहि नगरसेवकाने विरोध केलेला असतांना देखिल वॉटरग्रेस कंपनीला सफाईचा ठेका देण्यात आला होता.एप्रील महिन्यामध्ये तात्पुरत्या स्वरूपात बांधकाम विभागाच्या सफाई कर्मचार्यांचा सफाईचे काम देण्यात आले.त्यानंतर पाच महिन्यानी महापालीकेच्या महासभेमध्ये सफाईच्या ठेक्यावरून रणकंदण झाले होते.विरोधक शिवसेनेच्या नगरसेवकांनी विरोध केला होता.तरी देखिल वॉटरग्रेस कंपनीला ठेका देण्याचे मंजूर झाले.आता वॉटरग्रेस कंपनीचे काम शहरात सुरू झाले आहे. शहरातील घंटागाडी आणि ट्रॅक्टरद्वारे कचरा संकलित केला जात आहे.मात्र शहरातील कचरा पुर्णपणे उचलला जात नाही.अश्या तक्रारी नागरिकांकडून येत आहे.त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी मागील सलग दोन दिवस कचरा भरल्या जाणार्या ट्रॅक्टरमध्ये चक्क माती व झाडे वाहूुन नेत कचर्याचे वजन वाढविले जात असल्याचा प्रकार समोर आणला होता.वजन वाढल्यामुळे ठेकेदाराचे पैेसे देखिल वाढत होते.मनपा ठेकेदाराला कागदावरील नमुद केलेल्या वजनाप्रमाणे रक्कम देखिल अदा करीत आहे.
मनपामध्ये स्विकृत सदस्य धरून सत्ताधारी भाजपाचे 61, विरोधी शिवसेनेचे 16, आणि एमआयएम पक्षाचे 3 नगरसेवक आहेत.यापैकी सुमारे 30 टक्के नगरसेवक अभ्यासू आहेत.तरी देखिल साफसफाईच्या ठेक्यातील होत असलेल्या भ्रष्टाचाराबाबत कोणीही बोलण्यास तयार नाही.त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्या भुमिकेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.