वडती ता.चोपडा (प्रतिनिधी) – मुदत संपलेल्या चोपडा तालुक्यातील 52 ग्राम पंचायतींवरती अनेकांच्या ईच्छांवर विरजन पडले आणी अखेर कोर्टाच्या आदेशा नुसार शासकीय कर्मचा-यांची प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तसे मुख्य कार्यकारी अधि.जिल्हा परिषद जळगाव यांच्या कडून प्रशासक नियुक्त आदेश पत्र ग.वि अधि.पं.स. चोपडा माहीतीस्तव देण्यात आले आहे.

22 मार्च पासून कोरोना सारख्या संसर्गजन्य आजाराची साथ पसरू नये म्हणून उपाय योजनेच्या पार्श्वभूमिवर देशात लॉकडाऊन लागले. ते आजपावेतो देखील जवळपास सुरूच होते. त्याचा परिणाम सरकारी, निमसरकारी, व मानवी जनजीवनावर तीव्र स्वरूपात प्रभावीत झाला. तसा प्रत्येक विभागावर परीणाम दिसून आला. धार्मिक, सामाजिक, राजकिय तसेच कौटुंबिक कार्यक्रमांवरही याचा प्रभाव जाणवत आहे. त्याच प्रमाणे याचा प्रभाव राज्यातील मुदत संपुष्टात येत असलेल्या ग्रामपंचायत निवडणूकांवर सुद्धा झालेला आहे. निवडणूका न होता प्रशासकीय नियुक्ती करण्यात येणार हे या अगोदरच स्पष्ट करण्यात आले होते. यामध्ये प्रशासक म्हणून राजकिय पक्ष कार्यकर्ते का ? शासकिय कर्मचारी ? या हून अधिक तर काही पत्रकारांनी देखील मांगणी केली होती. हा संभ्रम कायम होता. परंतू कोर्टाच्या आदेशा नुसार शासकीय अधिकारी, कर्मचारी यांची प्रशासकीय म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रातील राजकिय पक्षातील कार्यकर्त्ये त्यांच्या नेत्यांकडे टक लावून बसले होते. परंतु त्यांचा भ्रमनिरास झाला.
प्रशासक नियुक्त करण्यात आलेल्या गावांची नावे पुढील प्रमाणे:– चहार्डी , बिडगाव अकुलखेडे,अजंतिसिम,अनवर्दे, भार्डु, भवाळे, बिडगाव, बुधगाव, चहार्डी, चांदसणी, चौगाव, चुंचाळे, दगडी बु., काजीपुरा, कमळगाव, खाचणे, खर्डी, खेडीभोकरी, कुरुवेल, कुसुंबे, लोणी, माचले, मजरे हिंगोणे, मजरेहोळ, मामलदे, मंगरुळ, मोहिदे, मौजे हिंगोणे, मितावली, नागलवाडी, निमगव्हाण, पंचक, पूनगाव, रुखणखेडे, तांदलवाडी, वढोदा, वर्डी, वरगव्हाण, वेले आखातवाडे, वेळोदे, विरवाडे व विटनेर ही आहेत.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ नुसार जे अधिकार व कर्तव्य सरपंचास असतात तेच अधिकार प्रशासकांना असणार आहेत. तसेच पुढील काळात सदर ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका होऊन विधिग्राह्यरित्या झालेली ग्रामपंचायत अस्तित्वात येईल तोपर्यंत प्रशासक म्हणून संबंधित शासकिय कर्मचार्यांना आपली जबाबदारी पार पाडावी लागेल.
एकंदरीत कोरोनामुळे का असेना परंतु गावकऱ्यांना राजकारणाविरहीत स्वच्छ कारभार बघायला मिळेल हिच सर्वसामान्य गावकऱ्यांची इच्छा असेल. प्रशासकांनी सुद्धा ग्रामपंचायतीचा कारभार स्वच्छ व प्रामाणिकपणे चालवावा हिच अपेक्षा नागरिकांची राहील.







