नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- अरुणालचल प्रदेशमधून बेपत्ता झालेले पाच तरूण चीनमध्ये सापडले आहेत. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने पाचही भारतीय तरुणांची सुटका केली असून आज सकाळी त्यांना भारताच्या ताब्यात देण्यात आले.
किबीथू सीमा चौकीवरुन हे युवक अरुणाचल प्रदेशमध्ये प्रवेश करतील चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी या युवकांना भारतीय लष्कराडे सोपवेल. या संदर्भात केंद्रीयमंत्री किरेन रिजीजू यांनी ट्वटिद्वारे माहिती दिली होती. एक सप्टेंबरपासून बेपत्ता असलेले हे पाच युवक शिकारी असल्याने लष्कराने म्हटले आहे.
दरम्यान, या कथित अपहरण झालेल्या पाचही जणांची सिंगकाम, प्रसात रिंगलिंग, डोंगटू इबिया, तानू बाकेर आणि नागरू दिरी नावे आहेत.







