मुंबई (वृत्तसंस्था) –शिवसेना नेते संजय राऊत यांना धमकावणाऱ्या तरूणाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पलाश घोष असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मुंबई पोलिसांच्या पथकाने त्याला गुरुवारी रात्री कोलकाता येथून अटक केली. आता त्याला मुंबईत आणण्याची न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे.
दक्षिण कोलकाता येथील टॉलीगुंगे भागात राहणारा पलाश घोष याला मुंबई एटीएसने अटक केली असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओ कॉलवरून त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना धमकावल्याचा आरोप आहे. पलाश याला आज न्यायालयात हजर केले जाणार असून त्याचा ट्रांझिट रिमांड घेऊन मुंबईत आणले जाईल.