धानोरा, ता.चोपडा (वार्ताहर) – येथून जवळच असलेल्या वरगव्हाण येथील रहिवासी व पुणे येथील इंद्रायणी सर्विसेस संचालक महेद्र पाटील यांची नुकतीच अखिल भारतीय गुजर देवसेनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

पुणे येथे वास्तव्यात असलेले व वरगव्हाण, ता.चोपडा येथील मुळ रहिवासी असलेले महेद्र ज्ञानेश्वर पाटील यांची देशभरातील विस राज्यात कार्यरत असलेली अखिल भारतीय गुजर देवसेनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी नुकतीच महाराष्ट्राचे राज्य अध्यक्ष डि.के.पाटील यांनी नियुक्ती पत्र देऊन केली आहे.त्यांच्या या निवडीबद्दल जिल्याचे पालक मंत्री गुलाबराव पाटील, भानुदास पाटील, रावसाहेब पाटील, गोपाल पाटील, सोनु जांगीड, अतुल चौधरी, डाॅ. चंद्रभान पाटील, दिनेश पाटील, संदिप पाटील यांच्यासह समाजसह विविध स्थरातील मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले आहे.
याबाबत महेद्र पाटील यांनी केसरीराजशी बोलतांना सांगीतले की, सामाजीक संघटनेने माझ्यावर मोठी जवाबदारी दिली असुन.लवकरच संघटनेचे जाळे आणखी वाढवुन त्यामाध्यामातुन समाजातील गोरगरीब घटकांच्या अडीअडचणी सोडवुन अन्याया विरोधात आवाज उठवून न्याय मिळवण्याठी कटीबंध राहणार आहे.







