मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोनानं सध्या देशाभरात धुमाकूळ घातला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत महाराष्ट्रातील जनतेला कोरोनापासून वाचण्यासाठी आवाहन केलं आहे.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी गर्दीपासून लांब राहा, शक्य होईल तितकं घरा बाहेर जाणं टाळा घरीच बसा, काम असेल तरच घराबाहेर पडा. असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांना कोरोनापासून सावध राहण्याचं आवाहन जनतेला केलं आहे.दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न चालू आहेत. याच पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पीएमपीएल च्या 584 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर सरकारनं विविध पर्यटनस्थळं,धार्मिक स्थळं बंद ठेवण्याचा देखील निर्णय गेतला आहे. गाव खेड्यांपासून ते मोठ्या शहरांपर्यंत कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी उपाययोजना राबविल्या जात आहेत.राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 42 वर गेली आहे. राज्यात सर्वाधिक रूग्ण हे पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये सापडले आहेत.