चाळीसगाव (प्रतिनिधी) – नानासाहेब बागुल व बापूसाहेब शिरसाठ यांनी दि.10 रोजी चाळीसगाव येथे जिल्हाधिकारी अभिजित राऊत व खा.उन्मेश पाटील यांच्या उपस्थितीत चर्चा केली.
चाळीसगावात कोरोनाच्या बिघडत्या परिस्थितीबाबत यावेळी मुख्य लक्ष वेधण्यात आले.जनतेची जनता कर्फ्युची मागणी असून, त्याबाबत प्रशासनाने योग्य भूमिका व सहकार्य करावे,नियमाची कडक अंमलबजावणी करावी. गरज पडल्यास जनता कर्फ्यु घोषित करावा लागल्यास सकारात्मक भूमिका ठेवावी.अशी दोघांनी संयुक्तपणे जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली.
तत्पूर्वी खा.उन्मेशदादांनी दोघांचा परिचय करून दिला. व या मागणीला व भूमिकेला तत्काळ पाठिंबा देवून सर्व मदत व सहकार्य मिळेल असे ही आश्वासन दिले तसेच आज संध्याकाळी होणाऱ्या बैठकीस नक्की उपस्थित राहीन असे सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विषय समजून घेतला व सविस्तर चर्चा करून जनता स्वयंघोषित कर्फ्यु करत असेल तर प्रशासनाची नक्कीच मदत राहील असे आश्वासन दिले.
यावेळी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार चाळीसगाव हे देखील उपस्थित होते.त्यांनी नंतर सकारात्मक भूमिका राहील असे सांगितले. या प्रसंगी पत्रकार मुराद पटेल, विजय गायकवाड, पत्रकार अर्जुन परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.चाळीसगाव बचाव समितीचे दिलीप घोरपडे, वर्धमान धारीवाल, योगेश भोकरे, दिनेश पाटील यांची तब्येत बरी नसल्याने ते प्रत्यक्ष सहभागी झाले नाहीत. या चर्चेमुळे व्यापारी संघटना प्रतिनिधी यांनी देखील समाधान व्यक्त केले.