आडगाव ग्रामपंचायत सदस्यांचा सवाल
जळगाव ( प्रतिनिधी ) यावल तालुक्यातील आडगाव ग्रामपंचात च्या सरपंच मंगला गणेश कोळी यांचा प्रलंबित तक्रारीचा निपटारा मुदत संपण्याआधी करण्यात यावा, अन्यथा तक्रार व्यर्थ जाण्याची शक्यता असून जिल्हाधिकारी साहेब सरपंचांविरुध्द कारवाई होईल का?अजून किती हेलपाट्या माराव्या लागतील असा सवाल श्री बाबा महाहसजी महाराज पॅनलचे प्रमुख व सदस्य यांनी केला.
निवेदनात म्हटले आहे की, आम्ही याबाबत संबधित अधिकारी यांना वारंवार तक्रार दाखल केले असता आता फक्त कोरोना चा कारण पुढे ढकलून या प्रकणाकडे डोळे झाक करीत आहे. अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने आम्ही न्याय कोणाकडे मागावा यासह विविध समस्या मांडल्या आहेत.सरपंच अपत्रतेच्या दिरगाई विरुद्ध आवाज उठवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संत श्री बाबा महाहसजी महाराज पॅनलचे प्रमुख व सदस्य यांनी आज दि.8 रोजी लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
आडगाव ग्रामपंचायतची मुदत दि.19-9-2020 रोजी अकरा दिवसानंतर संपणार असल्याने सरपंचा विरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी उपोषणात संत श्री बाबा महाहंसजी महाराज यांच्यासोबत आडगाव तालुका यावल येथील ग्रामपंचायत सदस्य शालुबाई गणेश पाटील व ग्रामपंचायत सदस्य प्रकाश मुलचंद पाटील यांच्यासह आडगाव येथील ग्रामस्थ कैलास महेंद्र पाटील, गुणवंत वसंत पाटील, प्रमोद संतोष पाटील, ज्ञानेश्वर सुरेश पाटील, नारी क्रांती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आशाबाई कौतिक पाटील व ज्ञानेश्वर डिगंबर पाटील आदी सदस्य उपस्थित होते.







