जळगाव (प्रतिनिधी) – महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय,जळगाव येथील कृषिदुत नरेंद्र ईश्वर पाटील विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी जागृकता कार्यनुभव कार्यक्रमाद्वारे जळगाव तालुक्यातील लमांजन येथील शेतकरी बांधवाना व ग्रामस्थांना कृषी विषयक मार्गदर्शन करत आहेत. कृषिदुत विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून जसे की, निबोळी अर्क बनविणे, चारा प्रक्रिया, शून्य ऊर्जा , शीत कक्ष, मातीचा नमुना घेणे. एकात्मिक तन नियंत्रण तसेच एकात्मिक कीड व रोग नियंत्रणाच्या पद्धती व फळबागांची लागवड इत्यादी प्रात्यक्षिके करून शेतकऱ्यांना आधुनिक व पारंपारिक शेतीची सांगड घालून आपले उत्पादन कसे वाढवता येईल याबद्दल मार्गदर्शन करीत आहे. या अभ्यास दोऱ्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.स.एम. पाटील, उपप्राचार्य प्रा. पी.एस.देवरे, कार्यक्रम समन्वयक प्रा.ए.दि.फाफळे व इतर प्राद्यापकांचे मार्गदर्शन लाभले तसेच शेतकरी व ग्रामस्थांचे वेळोवेळी सहकार्य लाभले. असे कृषिदुत नरेंद्र पाटील यांनी सांगितले.