औरंगाबाद – शिवसेनेचे नेते आणि धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजप नेते एकनाथराव खडसे यांना शिवसेनेत सामील होण्याची ऑफर दिली आहे त्यांनी एकनाथराव खडसे यांना बाहुबलीची उपमा दिली आहे. “कटप्पाने बाहुबलीला का मारले? हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे खडसे यांचं काय झालं ते नव्याने सांगायला नको. त्यांनी भाजप सोडून आता शिवसेनेत यायला हवं. आम्ही त्यांचे स्वागत करु”, असं अब्दुल सत्तार म्हणाले
“एकनाथराव खडसे यांच्यावर भाजपमध्ये खरंच अन्याय झाला आहे. त्यामुळेच शिवसेना आणि भाजपची युती तुटली. आता खडसेंनी आमच्याकडे यावं. हवं तर मी मध्यस्ती करेन. त्यांच्यासारख्या नेत्याची शिवसेनेलाही मदत होईल”, असं सत्तार म्हणाले.
“एकनाथराव खडसे कधीही संपणार नाहीत. राजकारणात एखादा अपघात होतो आणि त्या अपघाताने एखादा माणूस मागे पडतो. मात्र खडसे यांच्यावर भाजपमध्ये खरंच अन्याय झाला आहे. त्यांचं भवितव्य चांगलं आहे. त्यांनी शिवसेनेत यावं. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांच्याबाबत निश्चित बोलू”, खडसेंनी ओबीसी समाजाला घेऊन शिवसेनेत सामील व्हावं. त्याचा परिणाम निश्चितच चांगला होईल. खडसे आमचे नेते आहेत. त्याचबरोबर शिवसेनेला त्यांचा फायदाच होईल”, असंदेखील अब्दुल सत्तार म्हणाले.
खडसेंच्या आरोपांवर रावसाहेब दानवेंकडून सारवासारव
एकनाथराव खडसे यांच्या आरोपांवर रावसाहेब दानवे यांनी सारवासारव केली आहे. “एकनाथराव खडसे यांची नाराजी असेल ती चर्चाकरुन दूर करु. पक्षामध्ये वेळोवेळी बदल केले जातात. गरजेनुसार निर्णय घेतले जातात. आम्ही एकनाथराव खडसे यांच्याशी चर्चा करु”, अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी दिली.