कोरोनाबाधीत महिला शिरसोली नसून जळगावची ; गोदावरी कोविड रूग्णालयात उपचारासाठी दाखल !
जळगाव( प्रतिनिधी) – येथील जळगाव जिल्हा कोविड रूग्णालयातून फरार झालेली कोरोनाबाधीत महिला फरार झाल्याची माहिती मिळाली होती, ती कोरोनाबाधीत महिला शिरसोली नसून जळगावची असल्याची समजले आहे. पतीसोबत जिल्हा कोविड रूग्णालयातून फरार होऊन गोदावरी कोविड रूग्णालयात उपचारासाठी दाखल झाली आहे.
याबाबत माहिती अशी की, जळगाव शहरातील जिल्हा शासकीय कोविड रूग्णालयातुन शिरसोलीतील 43 वर्षीय महिला वार्ड क्र.10 मधून फरार झाल्याची तक्रार जिल्हा शासकीय कोविड रूग्णालयातील तक्रार निवारण कक्षाचे प्रमोद वानखेडे यांनी फोनद्वारे माहिती एमआयडीसी पोलीसात दिली होती.
याप्रकरणी पोलीसानी महिलेचा तपास केला असता सदर कोरोनाबाधित महिला ही शिरसोली नसून जळगावची असल्याची समजले आहे. या महिलेवर जिल्हा शासकीय कोविड रूग्णालयातील वार्ड क्र.10 मध्ये उपचार सुरु असतांना कोणालाही न सांगता जळगाव येथील आपल्या घरी आई सोबत निघून गेली होती, ही माहिती कोरोनाबाधित महिलेच्या पतीला कळताच पतिने महिलेला गोदावरी कोविड रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले, असल्याचे सांगितले आहे. याबाबत पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहे.