जळगाव(विशेष प्रतिनिधी) – जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून दिवसेदिवस कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. आतापर्यन्त ३० हजार कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांची नोंद झाली असून त्यात २२ हजार कोरोनामुक्त झाले असून आज धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यापाठोपाठ जळगाव शहरातील जिल्हा शासकीय कोविड रूग्णालयातुन शिरसोलीतील 43 वर्षीय महिला वार्ड क्र.10 मधून पळून गेल्याने जिल्हा शासकीय कोविड रूग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आल्याचे पुन्हा निदर्शनास दिसून आले.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात जिल्हा शासकीय कोविड रूग्णालयातील तक्रार निवारण कक्षाचे प्रमोद वानखेडे यांनी फोनद्वारे माहिती दिली की,वार्ड क्र.10 मधील कोरोनाबाधीत 43 वर्षीय महिला, रा. शिरसोली हि उपचार घेत असतांना कोणालाही न सांगता निघून गेल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहे.
याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनचे हवालदार जितेंद्र राठोड व शिरसोली येथील आरोग्य सेवक निलेश पाटील यांनी सदर कोरोनाबाधित महिलेचा तपास केला असता, हि महिला शिरसोली येथील रहिवासी नसल्याचे निदर्शनात येत आहे. यामुळे नेमकी हि महिला कुठली आहे याबाबात पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहे.







