जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील उमाळा येथील तलावात ६७ वर्षीय इसमाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी ५
सप्टेंबर रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली
आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील उमाळा गावातील रहिवासी हिरामण ओंकार बाबर
(६७) यांचा गावातील तलावात बुडून मृत्यू झाला. तलावात इसम बुडल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तात्काळ
घटनास्थही धाव घेत. मृतदेह बाहेर काढला परंतु तो पर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी
पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी अतुल पाटील, शुद्धोधन ढवळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह
शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात
मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.







