ओढरे ता.चाळीसगाव (प्रतिनिधी) – येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे कार्यरत असलेले प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त प्राथमिक शिक्षक तथा उपक्रमशील शिक्षक वासुदेव महारु माळी (पोहरेकर)यांना नुकताच ५ सप्टेंबर शिक्षकदिनाच्या पवित्र पर्वावर चाळीसगाव येथील ग्लोबल अस्तित्व फाऊंडेशनच्या वतीने राज्य स्तरीय आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार २०२० जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेश पाटील व पदाधिकारी यांच्या हस्ते सहपत्नीक गौरविण्यात आले या सामाजिक संस्थेने त्यांच्या सामाजिक ,शैक्षणिक तसेच विद्यार्थी हिताच्या विविध उपक्रमाची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे.यापूर्वी देखील वासुदेव माळी यांना अनेक सामाजिक संस्थांनी विविध पुरस्काराने सन्मानित केले आहे.त्यांच्या या पुरस्काराने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.








