जळगाव (विशेष प्रतिनिधी) – शहरातील आसोदा रेल्वेरुळा जवळ रेल्वेच्या धडकेत अजय नामदेव बागल वय 30 रा. कांचननगर या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी रात्री उशीरा घडली. शुक्रवारी सकाळी तरुणाचा मृतदेहाचे शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कांचननगरातील अजय बागल हा जैन इरिगेशनमध्ये कामाला होता. जेवणानंतर तो नेहमीप्रमाणे असोदा रेल्वे लाईनकडे फिरायला गेला होता. यादरम्यान रेल्वेच्या धडकेत त्याचा मृत्यू झाला. लाईनवर काम करत असलेल्या रेल्वे कामगारांनी मयताच्या खिशात पाकीट तपासले असता, पाकिटातील पॅनकार्ड वरुन त्याची ओळख पटली. पॅनकर्ड वरील पत्त्यानुसार मयत अजयच्या कुटुंबियांचा शोध सुुरु झाला. अजयच्या घरातील तरुणांना प्रकाराची माहिती मिळाल्यावर त्यांनी अजयच्या घरी त्याच्या भावाला तसेच वडीलांना माहिती दिली. त्यानुसार अजयचा मोठा भाऊ विजय, मामा जयंत शेळके यांच्यासह नातेवाईकांनी घटनास्थळ गाठले.
रेल्वे पोलिसांकडून घटनेची माहिती मिळाल्यानुसार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक चेतन पाटील, पोलीस नाईक बापू कोळी, पोलीस नाईक सुधाकर शिंदे, पोलीस नाईक धर्मेंद्र ठाकूर यांनी घटनास्थळ गाठले. तसेच रुग्णवाहिकेतून मृतदेह सध्यस्थितीत जळगाव- पाचोरा रस्त्यावरील नॉन कोव्हीड रुग्णालय गुलाबराव देवकर अभियांत्रिकी रुग्णालयात हलविले. याठिकाणी शुक्रवारी सकाळी मृतदेहावर शवविच्देन करण्यात येवून मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी कुटुंबियांनी एकच
आक्रोश केला. मयत अजय हा जैन इरिगेशन कंपनीत टिशू कल्चर विभागात गेल्या 10 वर्षापासून कार्यरत होता. त्याच्या पश्चात भाऊ विजय, बहिण, आई रेखा, वडील नामदेव केशव बागल असा परिवार आहे. अजयचा मोठा भाऊ विजय हा मोबाईल कंपनीत मार्केटींग करतो. वडील नामदेव केशव बागल हे हातमुजरी करतात. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस नाईक बापू कोळी करीत आहेत.







