जळगाव (विशेष प्रतिनिधी)- ज्युदो म्हणजे सभ्यतेचा मार्ग असलेला हा खेळ जगामध्ये सगळ्यात जास्त खेळला जाणारा व लोकप्रिय असलेला हा खेळ आहे. ज्युदो ऑलिंपिक, आशिया, कॉमनवेल्थमध्ये खेळला जातो. तसेच शालेयस्तर , विदयापिठस्तरवर हा खेळ खेळला जातो. ज्युदो खेळात प्रावीण्य मिळवुन महाराष्ट्राचे अनेक खेळाडू शासकीय सेवेत रुजु आहे. अशा या जगात भारतात व महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेल्या ज्यूदो खेळाची सुरूवात जळगावात सन 2013-14 मध्ये जळगाव जिल्हा हौशी ज्युदो असोशिएशनची स्थापना एकच ध्यास ज्युदोचा विकास हे उद्देश ठेवुन अध्यक्ष विष्णु भंगाळे यांच्यां प्रयत्नाने झाली असून जळगाव जिल्हा ज्युदोमय होत असल्याची माहिती प्रा.डॉ.उमेश पाटील यांनी सांगितले.

श्री.पाटील पुढे म्हणाले की, ज्युदो असोशिएशनला पाठबळ देणारे जळगाव जिल्हा संघटनेचे सुनील भंगाळे, हर्षल चौधरी, ललीत महाजन, विवेक महाजन, दिपक वाडे, अजय काशिद, राजु वारके ,सचिन वाघ, सादिक शेख इत्यादी कार्यकरणार्या सदस्यामुळे बघता बघता कमी वेळातच संपुर्ण जिल्हा ज्युदोमय होऊ लागला. गेल्या सात वर्षात जिल्हा संघटनेने यशस्वी अशी गरूड झेप घेतलेली आहे.
स्थापना होताच जिल्हा संघटनेने महाराष्ट्र ज्युदो संघटनेच्या व राज्य सचिव मा. दत्ता आफळे यांच्या मार्गदर्शनाने जिल्हात पाय रोवण्यास सुरवात झाली व त्यांच्या सहकार्याने संपुर्ण जिल्हाभर प्रशिक्षण शिबीरे भरवण्यास सुरूवात केली. या प्रशिक्षणांना कॉमनवेल्थ पदक प्राप्त खेळाडू योगेश धाडवे या सारख्या नावाजलेल्या खेळाडू प्रशिक्षकांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्याचेच फलस्वरूप जिल्हात चांगले प्रशिक्षक तयार होऊ लागले. महाराष्ट्र ज्युदो संघटना आयोजीत सर्व वयोगट स्पर्धात जळगाव जिल्हा हौशी ज्युदो संघटनेचे खेळाडू सक्रीयपणे सहभाग घेऊ लागले .आणि खेळाडूनां मिळालेले चांगल्या प्रशिक्षणांच्या जोरावर पदक प्राप्त करू लागले त्यामधील तीन खेळाडूचीं निवड राष्ट्रीय पातळीवर झाली. त्यांच प्रमाणे शालेय स्पर्धा व आंतर विदयापीठ स्पर्धा खेळाडू गाजवु लागले अखिल भारतीय विदयापीठ स्पर्धेत जिल्हातील खेळाडूंनी जळगावचा झेंडा फडकवला. त्यामध्ये जिल्हा संघटनेचा यशाचा मानाचा तुरा म्हणजे 2019 साली झालेल्या सब ज्युनीयर व कॅडेट स्पर्धाचे यशस्वी आयोजन संपुर्ण राज्यातुन आलेले खेळाडू व उत्तम नियोजन यामुळे या स्पर्धा यशस्वी झाल्यात.आज जळगाव जिल्हात ज्युदो चा आलेख बघितला तर शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागात सुध्दा ज्युदो खेळाची लोकप्रियता बघण्यास मिळते. साहसी समजला जाणारा या खेळामध्ये महीलांचा सहभागपण लक्षणीय असतो.जळगाव शहरामध्ये खेळाडूनां प्रशिक्षणांसाठी संघटनेचे अध्यक्ष विष्णु भंगाळे यांनी सरदार वल्लभभाई पटेल हॉल सरावासाठी दिला.व प्रा. उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली यांच्या परिश्रमाने त्या इतरही ठिकाणी प्रशिक्षण सुरू झाले. शहराप्रमाणे अमळनेर, पाचोरा , रावेर , शेदुर्णी, जामनेर, यावल, भुसावळ, चाळीसगाव , एंरडोल व वरणगाव या ग्रामीण ठिकाणी प्रशिक्षण सुरू झाले . जिल्हा प्रशिक्षक म्हणुन प्रा. उमेश पाटील, अजय काशीद , सचिन वाघ , सादीक शेख, प्रा. महेश पाटील , प्रा. सुभाष वानखेडे ,यज्ञेश जगताप , मयुर पाटील आदी खेळाडू घडविण्यास योगदान देत आहे. सात वर्षात अतुल गोरडे ,सचिन वाघ, यज्ञेश जगताप, जयेश जगताप, विनायक चौधरी, लोकेश साळुखे, हर्षदा सुर्यवंशी, शितल शिवदे, हर्ष शिंपी इत्यादी खेळाडूंनी जळगाव जिल्हाचे नावलौकीक केले आहे. पुढील वाटचालीची रूपरेषा संघटनेची तयार आहे.जळगावात चांगले उच्च दर्जाचे जास्तीत जास्त खेळाडू तयार व्हावे. तसेच त्यांच्यात आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होतील. जिल्हात अनेक राज्यस्तरीय स्पर्धा, राष्ट्रीय स्तरावरचे तसेच स्पर्धाचे नियोजन करणे.ज्युदो खेळाचा प्रचार व प्रसार संपुर्ण जिल्हात वेगाने करण्याचा उद्देश जळगाव जिल्हा हौशी ज्यूदो असोशिएशनचा असणार असल्याचे.जळगाव जिल्हा हौशी ज्युदो असोशिएशनचे सचिव प्रा.उमेश पाटील यांनी सांगितले.








