पारोळा (प्रतिनिधी) – कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव, ग्रामीण भागात कोरोना पिडीत असलेले रुग्ण टेस्ट करण्यासाठी करत असलेले दुर्लक्ष ही परिस्थिती पाहता आमदार चिमणराव पाटील यांनी आपल्या आमदार स्थानिक विकास निधी कार्यक्रमांतर्गत मतदारसंघातील एरंडोल तालुक्यासाठी ५०० व पारोळा तालुक्यासाठी ५०० असे एकूण १००० (एक हजार) रॅपिड टेस्ट कीट याची अंदाजित रक्कम १० लक्ष रुपये असून पारोळा व एरंडोल तालुक्यासाठी वितरीत केल्या.
ह्या निर्णयामुळे ग्रामीण व शहरी भागातील कोरोना पिडीत रुग्णास रॅपिड टेस्ट कीट विना प्रतिक्षा करावी लागणार नाही. एखाद्या ठिकाणी कोरोना संक्रमित रुग्ण आढळ्यास रॅपिड टेस्ट कीट उपलब्ध असल्याने त्याच्या संपर्कात असलेल्या व्यक्तीची चाचणी करणे सोपे होईल त्यांना रॅपिड टेस्ट कीट साठी विलंब करावा लागणार नाही.