अमळनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील जि.प. प्राथमिक शाळा लोणपंचम येथे संरक्षण भिंतीच्या कामाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आमदार अनिल भाईदास पाटील, दापोरीचे माजी सरपंच व कामगार नेते एल.टी.पाटील, पंचायत समिती सदस्य प्रविण पाटील, निवृत्ती बागुल, माजी सरपंच लोणपंचम डॉक्टर रामराव पाटील, भरवसचे सरपंच अशोक विनायक पाटिल, उपसरपंच बाळू हैबत पाटील, नितीन महारु पाटील, शांताराम महादू पाटील, डिगंबर गंगाराम पाटील, अनिल गुलाबराव पाटील, मनोज सुदाम पाटील, कैलास नीलकंठ पाटील, भरत धुडकू पाटील, विश्वास प्रकाश पाटील, दिलीप साहेबराव पाटील, राजेंद्र तुकाराम पाटील, प्रकाश शांताराम पाटील, उमेश पाटील, रविंद्र पाटील, उध्दव पंडित पाटील, दयाराम विश्वास भिल तसेच ग्रा.पं.सदस्य, वि.का.सो संचालक मंडळ, ग्रामसेवक, मुख्याध्यापकासह शिक्षकवर्ग यांच्यासह लोणपंचम ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते.
आमदार अनिल पाटील यांनी नंतर भरवस येथे पावसामुळे मागे घर पडून लोटन फत्तु मांग यांच्या पत्नी मयत झाल्या होत्या त्याच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले व त्याना धीर दिला व शासकिय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.