जळगाव (विशेष प्रतिनिधी) – अॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात एकदिवसीय बांबू कार्यशाळेचे आयोजन दि.12 संप्टेबर शनिवार रोजी सकाळी 10 ते 4 वाजता अॅग्रोवर्ल्ड, दुसरा मजला, जळगाव पिपल्स् बँकेच्यावर, बालाजी संकुल, ख्वॉजामियाँ चौक, जळगाव येथे करण्यात आले असून या कार्यशाळेत फक्त 20 जणांना प्रवेश देण्यात येणार आहे.
अॅग्रोवर्ल्ड तर्फे जळगावात एकदिवसीय बांबू कार्यशाळा कमी खर्चात जास्त उत्पादन देणारी बांबू शेती आहे.
या कार्यशाळेत मिळणारी माहिती :- लागवडीचा उद्देश, जमीन, प्रजातींची निवड, लागवड तंत्रज्ञान, संगोपन व नियोजन, उपलब्ध बाजारपेठ व विक्रीव्यवस्था, शासकीय योजना, पारंपारिक शेतीला सक्षम पर्याय, बांबू प्रक्रिया उद्योगाची प्राथमिक माहिती,बांबू कार्यशाळा शेतकर्यांसह बेरोजगारांसाठी संधी एक सुवर्णसंधी असून यात तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन व सहभाग प्रमाणपत्र मिळणार आहे. प्रश्नोत्तरांसाठी वेळ राखीव ठेवण्यात आला आहे.
नोंदणी शुल्क रू. 500/- प्रवेश मर्यादा फक्त 20 व्यक्ती.
कार्यशाळेत लेखन साहित्यासह सकाळचा चहा, नाश्ता, दुपारी जेवण, सायंकाळी चहा व सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. मर्यादित प्रवेश असल्याने आजच आपला प्रवेश निश्चीत करा असे आवाहन अॅग्रोवर्ल्डतर्फे करण्यात आले आहे.