जळगाव(विशेष प्रतिनिधी) – जळगाव रेल्वेस्थानका जवळील सागर सेल्स या होलसेल शोरुममध्ये चोरटयांनी आत प्रवेश करून शोरूम फोडल्याची घटना बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली.
पांढऱ्या रंगाच्या कार मधुन आलेल्या ५ भामट्यांनी शटर वाकवुन आत प्रेवश करून आतून सव्वा तीन लाखांची रोकड घेवुन पेाबारा केल्याची घटना घडली. भरत बियाणी यांनी तत्काळ पेालीसांना संपर्क केला. पेालीस येवूनही गेले पंचनामा केल्यानंतर दि.२ रोजी संध्याकाळी गुन्ह्याची नोद करण्यात आली.
शहरातील रेल्वेस्टेशन जवळील हॉटेल निसर्ग शेजारील सागर सेल्स या फुटवेअर होलसेल व्यवसायीक भरत बियाणी यांनी सांगितले कि, रात्री जवळपास साडेतीन वाजेच्या सुमारास त्यांना परिसरातील गुरख्याने फोन करुन चोरीची कल्पना दिल्याने तत्काळ मी दुकानावर पोहोचलो. शटर वाकवून चोरट्यांनी आत प्रवेश केला हेाता. आतील ड्रॉवर तोडून देान दिवसांच्या व्यवसायाची गोळा झालेली सव्वा तीन लाखांची रेाकड चोरट्यांनी लंपास केली आहे. भरत बियाणी यांच्या तक्रारीवरुन शहर पोलिस ठाण्यात संध्याकाळी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.