जळगाव (विशेष प्रतिनिधी)- जळगाव येथील अनेक खासगी रूग्णालयात निगेटिव्ह रूग्णावर उपचार केले जात नाही.शासकीय वैद्यकीय महाविद्यालातील कोविड सेंटरमध्ये निगेटिव्ह रूग्णालाही पॉझिटिव्ह रूग्णाच्या कक्षात उपचारासाठी दाखल करत असल्याचे प्रकार घडत आहे. निगेटिव्ह रूग्ण हा व्हेन्टिलेटरवर असतांना त्यांना वेगळ्या कक्षात दाखल करून त्याच्यावर उपचार करून सुविधा मिळण्याची मागणी जनसंपर्क अधिकारी फारूक शेख यांनी जळगाव येथील शासकिय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठता डॉ. रामानंद जयप्रकाश यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रथमत: रूग्ण हा सस्पेक्टेड म्हणून ठेवण्यात येतो.काहि दिवसानंतर त्याचा रिपोर्ट आल्यावर तो रूग्ण जर कोविड पॉझिटिव्ह असला तर त्यास रूग्णालयात सेवा दिली जाते. फारूक शेख यांच्या निदर्शनास आले आहे की, रूग्ण हा कोविड पॉझिटिव्ह आल्यावर ट्रिटमेंट नंतर तो 7/8 दिवसात कोविड निगेटिव्ह होतो.परंतु दुदैवाने तो व्हेन्टिलेटर असतो. नियमानुसार तो रूग्ण कोविड निगेटिव्ह असल्याने आपण त्यास डिस्चार्ज देण्याच्या तयारीत असतात व त्याच्या नातेवाईकांस रूग्णालयाती कर्मचारी तगादा लावतात की,या रूग्णास आपण बाहेर खासगी रूग्णालयात घेवून जा परंतु जळगाव शहरात कोणतेही खासगी हॉस्पिटल निगेटिव्ह व तोही व्हेन्टिलेटरवर असलेल्या रूग्णावर उपचारासाठी नकार देतात.

शासकीय रूग्णालयात सुध्दा निगेटिव्ह रूग्णाला पॉझिटिव्ह रूग्णाच्या कक्षात दाखल करून उपचार केल्याचा प्रकार घडत आहे.त्यामुळे निगेटिव्ह रूग्णाचा संक्रमित व्हायरसमुळे त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहे.
अशाच प्रकार जळगाव शहरातील उस्मानिया पार्कमधील एका 36 वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला तर तांबापूर येथील 42 वर्षीय महिला हे दोघेजण निगेटिव्ह असतांना त्यांना व्हेन्टिलेटर लावून शासकीय महाविद्यालय रूग्णालयात वार्ड क्र.6 मध्ये उपचारासाठी दाखल केला होता.
निगेटिव्ह रूग्णालाही पॉझिटिव्ह कक्षात उपचार होत असून निगेटिव्ह रूग्णाना वेगळ्या सुविधा देण्याची मागणी जनसंपर्क अधिकारी फारूक शेख यांनी केली आहे.याबाबत जिल्हाधिकार्यांनाही माहिती प्रत पाठविण्यात आली आहे.







