मुंबई (वृत्तसंस्था) – नालासोपारा येथे मध्यरात्री दीडच्या सुमारास ४ मजली इमारत अचानक कोसळली. इमारत कोसळत असल्याचे लक्षात येताच सर्व रहिवाशी तात्काळ बाहेर निघाल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही. ही इमारत १० वर्षे जुनी होती.

माहितीनुसार, नालासोपारा पूर्वेकडील संकेश्वर नगर येथे साफल्य नावाची इमारत आहे. सोमवारी मध्यरात्री इमारतीचा काही भाग कोसळला. इमारत कोसळत असल्याचे लक्षात येताच सर्व रहिवाशी तात्काळ बाहेर निघाल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, अनेकांचे संसार ढिगाऱ्याखाली येऊन त्यांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान व पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
मुंबई – नालासोपारा येथे मध्यरात्री दीडच्या सुमारास ४ मजली इमारत अचानक कोसळली. इमारत कोसळत असल्याचे लक्षात येताच सर्व रहिवाशी तात्काळ बाहेर निघाल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही. ही इमारत १० वर्षे जुनी होती.







