दोघे सख्ये भावांनसह एका चुलत भाऊचा समावेश ; चोपडा तालुक्यातील दुर्दैवी घटना

चोपडा (प्रतिनिधी) – तालुक्यातील विरवाडे येथील दोघे सख्ये भाऊ व एक चुलत भाऊ अस्या तीन तरुणांनाचा आज दुपारी बारावाजेच्या सुमारास गुळनदीत पोहोण्यास गेले असता खोल डोहात पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तीगांचा बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण विरवाडे गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत सविस्तर माहिती असी की
विरवाडे पासून चार किलोमीटरवर असलेल्या गुळनदीवर विरवाडे येथील महाराणा चौकातील तरुण पोहायला गेले असता त्यातील दोन सखे भाऊ कुणाल भरतसिंग पाटील (वय२०),सुमित भरतसिंग पाटील (वय२२ ) पाण्याचा अंदाज न घेता नदीत उतरले त्यांना २० वाचवण्यासाठी त्याचा चुलत भाऊ ऋषिकेश रजेसिंग पाटील (वय २२ ) गेला असता आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास पाण्यात वाहून गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती गावकर्यांना मिळाली तिन्ही तरुणांना आज दुपारी 3 वाजता तरुणांचे मृतदेह हे उपजिल्हा रुग्णालयात शव विच्छेदनासाठी आणण्यात आले या घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत चोपडा शहर पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली आहे. पुढील तपास चोपडा शहर पोलीस करीत आहे.







