जळगाव (विशेष प्रतिनिधी) – यंदा कोरोनामुळे गणेशोत्सवावर पाणी फेरले असले तरी कोरोनाला हरविण्यासाठी जिल्हा प्रशासन व मनपा प्रशासनातर्फे गणेश मंडळाना तसेच नागरिकांना आवाहन करण्यात आले होते की,निर्माल्य आणि गणपतीची मुर्ती संकलन करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.तसेच शहरातील सामाजिक संस्थाना सोबत घेवून ठिकठिकाणी चौका चौकात मंडप टाकून व्यवस्था करण्यात आली आहे.सिंधीकॉलनी परीसरात शहरातील टायगर ग्रृपतर्फे निर्माल्य व गणपतीमुर्तीचे संकलन करण्यात येत आहे.दुपारी 1 वाजेपर्यंत 230 गणपती मुर्ती संकलन करण्यात आले होते.हा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार असल्याचे गौरव उमप यांनी सांगितले.
यावेळी सिंधीकॉलनी येथे जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक अकबर पटेल व त्यांच्यासोबत पोलीसस्टेशनचे कर्मचारी यांच्या हस्ते गणपती मुर्तीचे संकलन करण्यात आले.टायगर ग्रृपचे अध्यक्ष तानाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या कित्येक वर्षापासून शहरात गरजूंना मोफत अन्नदान तसेच विविध उपक्रम राबविण्यात येत असतात.अंनत चतुर्थीनिमित्ताने सिंधीकॉलनीत निर्माल्य व गणपती मुर्तीचे संकलनासाठी निलेश बागडे,गणेश बागडे,जितू निंबाळकर,किशोर पाटील,दिपक भालेराव, अंकुश मराठे,विवेक नेतले,गौतम टिळंगे,अमर लोंढे, मयूर बागडे,आकाश दहियेकर,मनोज पाटील,निलेश पाटील, सन्नू वारंगे, वेदांत सावकारे,आदि असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी परीश्रम घेत आहेत.








