जळगाव (विशेष प्रतिनिधी)- सध्या शहरात कोरोनाने थैमान घातले असून त्यात पावसाने भर घातली असतांना ठिकठिकाणी कचर्याचे ढिगच्या ढिग साचले आहे. जळगाव शहरातील प्रमुख व्यापारी संकुलांपैकी एक असलेल्या गोलाणी मार्केटमध्ये ठिकठिकाणी कचर्याचे ढिग साचल्याने परीसरात दुर्गंधी पसरली असून घाणीचे साम्राज्य झाले आहे. मात्र याकडे मनपाच्या आरोग्य विभागाच्या संबधित अधिकारी व कर्मचार्यांनी झोपेचे सोंग घेतल्याचे दिसून येत आहे.

गोलीणी मार्केटमथील चौथ्या मजल्यावरील दुकान नंबर एफ 12 जवळील परीसरात गेल्या काहि महिन्यापासून कचर्याचे ढिगच्या ढिग पडल्याने परीसरात दुर्गंधी पसरत असून रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.परीसरात असलेल्या शौचालयात अस्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे.नागरीक लघुशंकेसाठी शौचालयात येत असतांना त्यांना दुर्गंधी सहन करावी लागत आहेत. कारण पाईप चोकअप झाल्याने पाणीजाण्यासाठी जागाच नसल्याने पाणी बाहेर येत असल्याने पाण्याचे डबके साचत आहे.या डबक्यामुळे डांसाची उत्पत्ती होत असल्याने डेंग्यूसारखे रोग पसरण्याची शक्यता आहे. मनपातील आरोग्यविभागातील संबधित अधिकारी किंवा कर्मचारी या समस्येकडे ढुंकूनही पाहत नसल्याचे दिसून येत आहे.
गोलाणी मार्केटमधील व्यावसायिकांचे आरोग्य धोक्यात आले असतांनाही महानगरपालिका आरोग्य विभागाकडून स्वच्छता केली जात नाही.आरोग्य विभागाने दुर्लक्ष केल्याने मनपा आयुक्त सतिश कुलकर्णी व महापौर भारती सोनवणे यांनी या प्रकाराची दाखल घ्यावी व आरोग्य विभागाला परीसरात साफसफाई करण्याच्या सूचना करण्यात याव्या अशी मागणी परीसरातील गाळेधारकांनी केली आहे.









