मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यात सर्वसामान्य नागरिकांबरोबरच करोना योद्धे जमल्या जाणाऱ्या पोलिसांनाही दिवसेंदिवस करोनाचा अधिकच संसर्ग होत असल्याचे दिसत आहे.

केवळ संसर्गच नाहीतर करोनामुळे पोलिसांचा मृत्यू देखील होत आहे. मागील 24 तासांमध्ये राज्यभरात आणखी 161 पोलीस करोनाबाधित आढळले असून, एका पोलिसांचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील करोनाबाधित पोलिसांची संख्या आता 14,953वर पोहचली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले 2,800 जण, करोनामुक्त झालेले 11,999 जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या 154 जणांचा समावेश आहे.
राज्यातील एकूण करोनाबाधित पोलिसांमध्ये 1,596 अधिकारी व 13,357 कर्मचारी यांचा समावेश आहे. सध्या उपचार सुरू असलेल्या ऍक्टिव्ह रुग्णांमध्ये 364 अधिकारी व 2 हजार 436 कर्मचारी आहेत.करोनामुक्त झालेल्या पोलिसांमध्ये अधिकारी 1,217 व 10,782 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.







