

जळगाव (विशेष प्रतिनिधी)- जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत शारिरीक शिक्षण विषयाकरीता पी.एच.डी.मार्गदर्शक म्हणून के.सी.ई.सोसायटी संचलित मूळजी जेठा महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा.डॉ.श्रीकृष्ण बेलोरकर यांची निवड करण्यात आली.यावेळी के.सी.ई.सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार जी.बेंडाळे,प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर,संचालक डी.टी.पाटील,मू.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.स.ना.भारंबे, व कुलसचिव डॉ.जगदिश बोरसे यांनी अभिनंदन केले.







