आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांना यश

पारोळा (प्रतिनिधी) – पारोळा तालुक्यातील कंकराज ल.पा.तलाव.पुनर्भरण करण्यासाठी आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांनी बोरी उजवा कालव्याने सोडण्यात आलेल्या पाण्याने दि. 30 रोजी कंकराज ल.पा.तलाव 100% पुर्ण भरलेला आहे. बोरी धरणातून 01/07/2020 रोजी बोरी उजवा कालव्याने कंकराज ल.पा.तलाव.पुनर्भरणासाठी पाणी सोडण्यात आले होते.बोरी धरण ते कंकराज ल. पा.तलावाचे अंतर 32 की.मी. असुन 21 की.मी. पाणी कालव्याद्वारे व पुढे नाल्याव्दारे कंकराज प्रकल्पात सोडण्यात येते. याच्याने कंकराज व भिलाली या गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला असून शेवगे, कंकराज, भिलाली या क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या देखील शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याच्या प्रश्न सुटला आहे. तसेच कंकराज ल.पा. तलाव १००% पुनर्भरन झाल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच ग्रामस्थ व शेतकरी बांधवांकडून आमदार चिमणराव पाटील यांचे आभार व्यक्त होत आहेत. या धरणाच्या पुनर्भरनासाठी ध. ब. बेहेरे ( कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग जळगाव ) व एम.आर. मीठ्ठे, (उपविभागीय अभियंता.) अजिंक्य जे. पाटील ( शाखा अधिकारी) पी. जे. काकडे ( शाखा अधिकारी ). व्ही. एम्. पाटील ( स्थापत्य अभियांत्रिकी साहयक) नाना पाटील, शशिकांत पाटील, अतुल पाटील ( कालवा निरिक्षक )तसेच पाटबंधारे विभागातील सर्व कर्मचारी यांनी प्रयत्न केले असुन त्याचे देखील कौतुक आमदार चिमणराव पाटील यांचेकडून करण्यात आले.







