जळगाव (प्रतिनिधी) – महामंडलेश्वर प.पू.स्वामी श्री.जनार्दन हरिजी महाराज यांची ४२ वा अवतरण दिवस दि. २८ रोजी मोठ्या उत्साहात सतपंथ आश्रम फैजपूर येथे पार पडला.

जळगाव येथील जिवलग मित्र ग्रुपतर्फे यानिमित्त महाराजांची स्वेटर तुला करण्यात आली हे सर्व स्वेटर भविष्यात येणाऱ्या कडाक्याच्या थंडीच्या पार्श्वभूमीवर गरजू लहान बाळ गोपाळांना थंडीपासून संरक्षण म्हणून महाराजांच्या हस्ते वाटप करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमप्रसंगी पंकज रणधीर, योगेश भामरे, बापू सोनार, उमेश विसपुते, भामरे व जिवलग ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते.







