धुळे (विशेष प्रतिनिधी) – शिरपूर तालुक्यातील लाकडया हनुमान येथील रहिवाशी चंदनसिंग रामश्या पावरा याच्या राहत्या घरातुन पोलिसांनी ७ लाख १५ हजार रुपये किंमतीचा १४३ किलो सुका गांजा व एक लाख रुपये किंमतीचे १० किलो गांजा लागवडीकरिताचे बियाणे असा एकूण ८ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना घडली.

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सपोनि अभिषेक पाटील यांच्यासह पथकाने ही कारवाई केली. विशेष म्हणजे हा गांजा घरातील धान्य साठवूण ठेवण्याच्या कोठयांमध्ये भरलेला होता. याप्रकरणी पोसई दिपक वारे यांनी दिलेल्या फिर्यादी चंदनसिंग पावरा याच्याविरुद्ध शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र खैरनार हे करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधिक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधिक्षक राजु भुजबळ व उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अभिषेक पाटील, पोसई पोसई नरेंद्र खैरनार, पोसई दिपक वारे, पोना पवन गवळी, संजीव जाधव, प्रविण धनगर पोकॉ आरीफ पठाण, संदीप शिंदे, सिध्दांत मोरे, ज्योती गवळे यांनी केली आहे. गांजा विक्री करणाऱ्याला पोलिसांची चाहूल लागताच संशयित पावरा हा पसार झाल्याची माहिती मिळाली.








