मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोनानं संपूर्ण जगभरात थैमान घातलं असून आता मुंबईत आणखी चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. यातील 3 व्यक्ती नवी मुंबईतील तर 1 मुंबईतील असल्याचं समोर आलं आहे. सध्या राज्यात कोरोनारूग्णांची संख्या 37 वर पोहोचली आहे तर देशात 110हून अधिक रूग्ण सापडल्याची माहिती मिळत आहे. काल पुण्यातील पिंपरी चिंचवड भागात कोरोनाचा एक रूगण सापडला आहेे पुण्यातील रूग्णांची संख्या 16 इतकी झाली आहे. संपूर्ण देशात भीतीचं वातावरण अहे. प्रत्येक माध्यमातून नागरीकांना काळजी घेण्याचं अवहान सरकारकडून केलं जात आहे. राज्यातील शाळांना कोरोनाच्या पारश्वभूमीवर सुट्या जाहिर करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा फटका शेअर मार्केटलादेखील बसला आहे. आज शेअर मार्केटचा सेन्सेक्स 200 अंकानी घसरला आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.