नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – स्वातंत्र्यदिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या सुरक्षेवर बोलताना एलएसी आणि एलओसीच्या वर वाकड्या नरजेने पाहणाऱ्यांना आपण सडेतोड उत्तर देवू शकतो आणि त्याचे उदाहरण नुकतेच जगाने लडाखमध्ये पाहिले असल्याचे म्हटले. मोदींच्या याच वक्तव्यावर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी टीका केली आहे. राहुल गांधी यांनी देशाच्या लष्कराविषयी विश्वास व्यक्त करत मोदींच्या भ्याडपणामुळे चीनने भारताची जमीन घेतल्याचा आरोप केला आहे.

पूर्व लडाखमध्ये चीनसोबत सुरू असलेल्या सीमावादावरून कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ट्विट हल्ला केला आहे. प्रत्येकाला भारतीय लष्कराच्या क्षमता आणि शौर्यावर विश्वास आहे. फक्त पंतप्रधानांना वगळून. ज्यांच्या भ्याडपणाने चीनला आमची जमीन घेण्याची परवानगी दिली. ज्यांच्या खोटेपणामुळे हे निश्चित होईल की ते हे कायम ठेवतील, असे म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.







