जळगाव (प्रतिनिधी) – सम्यक मैत्रेय फाऊंडेशन तर्फे कोरोना योद्धा म्हणून मिलिंद तायडे यांना नुकतेच सन्मानित करण्यात आले असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .

स्व. ईश्वरकांबळे हे या संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष होते . त्यांच्या वाटचालींवर पाऊल ठेवत पँथर डॉ . राजन माकणीकर यांनी रिपाईचे जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा आयटी सेल प्रमुख मिलिंद तायडे यांची निवड कोरोना योद्धा म्हणून केली . या निवड समितीमध्ये सन्मानपत्र निवड समिती राणीताई एमराजन, उपाध्यक्ष राजेश पिल्लाई, महासचिव पँथर श्रवण गायकवाड यांनी कोविड योद्धा सन्मानपत्र देऊन त्यांचा नुकताच सन्मान केला . मिलिंद तायडे यांचे रिपाइं मुंबई प्रदेशाध्यक्ष रतन अस्वारे,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे,जिल्हाध्यक्ष राजु सूर्यवंशी, यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.








