जळगाव ;- खासगी कंपनीत काम आटोपून सायकलने घरी जाणाऱ्या प्रौढास मागून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशरने जोरदार धडक दिली. यात त्यांच्या डोके आणि डोळ्यांवर गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात आयशर चालकाविरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.
एमआयडीसीतील हितेश प्लास्टिक कंपनीत कामाला सुनिल गोविंदा पवार (वय-५०) हे आहे. आज दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास कंपनीतील काम आटोपून सायकलने घरी परतत असतांना जळगाव औरंगाबाद महामार्गावरील गुरांच्या मार्केटजवळ असलेल्या सुनिल ॲग्रो समोर मागून येणाऱ्या आयशर क्रमांक (एमएच १८ एए ९७४०) याने जोरदार धडक दिली. यात सुनिल पवार यांना डोक्याला आणि डोळ्यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर प्राथमोपचार केल्यानंतर खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान अपघात झाल्यानंतर अयशर ट्रकसह चालकास एमआयडीसी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.