सामाजिक कायकर्ते आणि दक्ष पत्रकार श्री.संतोष बाबुराव पाटील सन्मान पत्र देऊन गौरव
अमळनेर (प्रतिनिधी) – युवा कल्याण प्रतिष्ठानच्या वतीने बहादरवाडी गावाचे सामाजिक कायकर्ते आणि दक्ष पत्रकार श्री.संतोष बाबुराव पाटील यांना सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.त्यांनी कोविड 19 महामारीच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता,आपले जीवन जेवढे मौल्यवान तेवढे दुसऱ्यांचे जीवन देखील मौल्यवान आहे या भावनेतून गरीब व गरजू लोकांना मदत व सहकार्य केले.त्यांचे हे सामाजिक बांधीलकी नेहमीच स्मरणात राहील.
युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप घोरपडे सर,बन्सीलाल भागवत सर,अशोक पवार सर इत्यादी मान्यवर व गावातील नागरिक उपस्थित होते.त्यांचे सामाजिक कार्य उत्तरोत्तर असेच वाढत राहो हीच सदिच्छा,व त्याचे मनापासून अभिनंदन







