अमळनेर (प्रतिनिधी)- 1992 मध्ये अयोध्या येथे बाबरी मशिदीचे पतन झाले तेव्हा मा शिवसेना प्रमुख बाळासाहेब यांच्या आदेशाने कारसेवेत सहभागी होण्यासाठी अमळनेर शिवसेनेचे तत्कालीन तालुकाप्रमुख नरेंद्रसिंग ठाकोर, जेष्ठ शिवसैनिक स्व उत्तमराव गायकवाड,पैलाड चे दिपक खंडू लांडगे,राजेंद्र नवल पाटील (भोला टेलर) सखाराम जाधव स्टेशनरोड,विश्वनाथ पाटील हे शिवसैनिक कारसेवक म्हणून सहभागी झाले होते व त्यावेळेस मोठ्या कष्टाने कठिण आपत्तीतून सुखरूपपणे अमळनेरात पोहचले होते, काल अयोध्या येथे राम मंदिराच्या भूमिपूजनकार्यक्रम झाल्यानंतर आज अमळनेर शिवसेने तर्फे ह्या कारसेवक शिवसैनिकांचा त्यांच्या घरी जाऊन तालुकाप्रमुख विजू मास्तर,शहरप्रमुख संजय पाटील ,रामचंद्र परब,विशाल शर्मा,विजय पाटील,सुनील देवरे ,लखन भारवाड सह पदाधिकारी उपस्थित होते,पक्षा तर्फे हा सत्कार झाल्याने कारसेवकांनी कृतज्ञतापूर्वक आभार व्यक्त केले. व 28 वर्षांनी का असेना श्रीराम मंदिराला सुरुवात झाली म्हणून आनंद व्यक्त केला व जे त्याठिकाणी हजर होते व ज्यांच्या प्रेरणेने म्हणजे मा बाळासाहेबांच्या आदेशाने बाबरी मशिदीचा घुमूट शिवसैनिकांनी जय श्रीराम म्हणत तोडला होता त्या पक्षाच्या नेत्यांना कार्यक्रमात आमंत्रित देखिल केले नाही म्हणून खंत व्यक्त करून निषेधही व्यक्त केला.








