नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – लाखो-करोडो हिंदूंचे श्रद्धास्थान प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मंदिराचे भूमिपूजन समारंभ बुधवारी अयोध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावाचा योगी आदित्यनाथऐवजी आदित्य योगीनाथ असा उल्लेख केला. यावरून आता सोशल मीडियावर मीम्स व्हायरल झाले आहेत.
दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये भाजप सरकार आल्यानंतर येथील अनेक प्रसिद्ध ठिकाणांची नावे बदलण्यात आली. हाच धागा पकडत नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.







