नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – करोना व्हायरसमुळे अर्थव्यस्थेवर वाईट परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दर जैसे थेच ठेवले आहेत. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

रिजर्व्ह बँकेने रेपो दर जैसे थेच ठेवले आहेत. यामुळे रेपो रेट ४ टक्के तर रिव्हर्स रेपो रेट ३.३५ टक्क्यांवर कायम आहे. यावेळी शक्तिकांत दास म्हणाले कि, करोनामुळे आपल्यावर आर्थिक संकट ओढावले आहे पण गेल्या तिमाहीपेक्षा यावेळी परिस्थिती सुधारली आहे. करोनाची लस आल्यावर आपली आर्थिक स्थिती बदलू शकते, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
रेपो रेट म्हणजे काय ? सार्वजनिक बँका आपल्या कर्जाची मागणी पूर्ण करण्यासाठी रिजर्व्ह बँकेकडून पैसे घेते, त्या पैशांवर रिजर्व्ह बँकेकडून जो दर आकारला जातो त्यास रेपो रेट असे म्हणतात.







