पाटणा (वृत्तसंस्था) – अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाने आज वेगळेच वळण घेतले. मुंबई पोलीस या प्रकरणी हाट प्रोफाईल लोकांची चौकशी करत असताना तिकडे सुशांतच्या वडिलांनी त्याची मैत्रिण रिया चक्रवर्तीच्या विरोधात पाटण्यात तक्रार दाखल केली आहे. यातच या प्रकरणात पोलिसांकडून अंकिता लोखंडेचीही चौकशी करण्यात आली आहे. मात्र आता या प्रकरणी देशातील अनेक नेत्यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,आयपीएस अधिकारी आणि बिहार शहर पूर्वचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी मुंबईत आले होते. मात्र मुंबईत आल्यानंतर मुंबई महापालिकेने विनय तिवारी यांना क्वारन्टाइन केलं यावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, ते माध्यमांशी बोलतांना म्हणाले,’ पोलीस अधिकाऱ्याला अशी वागणूक देणे योग्य नाही . आमच्या पोलीस अधिकाऱ्याला दिलेली वागणूक चुकीची असल्याचे म्हटलं आहे . महाराष्ट्र सरकारशी याबाबत चर्चा करणार आहे. त्यांच्या मते झालेला प्रकार हा CRPC चे उल्लंघन आहे. त्यामुळे आता या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या अडचणी वाढण्याची चिन्ह दिसत आहेत.’







