यावल (प्रतिनिधी) – शहरात पोलिस गस्त घालत असतांना चोपडा रोड वरील एका हॉटेल लागुन असलेल्या झोपडपट्टी भागात गल्लीमधे गोवंश जातीच्या प्राण्यांची हत्या करुन त्याचे मास कापत असतांना एक व्यक्ती आढळुन आला त्याच्या विरुद्ध यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करुन आरोपीस अटक करण्यात आली आहे. यावल तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

पो.कॉ. सतीश एकनाथ भोई यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दि. ०२ आगस्ट रविवार रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास यावल चोपडा रोडने हॉटेल खान दरबार येथून गस्त करीत असताना तेथे रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या गल्लीमधील झोपडपट्टी भागात लोकांची पळापळ सुरु झाली म्हणून खाली उतरून त्या ठिकाणी बघितले असता एका प्लॅस्टिक कागदाच्या आडोशाला व सार्वजनिक जागेवर संशयित आरोपी अफजल करीम शेख (वय ३० , रा , डांगपुरा यावल ) हा बेकायदा विनापरवाना गोवंश जातीच्या प्राण्याची हत्या करून त्याचे मास कापत असताना मिळून आला त्याचे जवळून गोवंश जातीचे प्राण्याचे मांस त्याचे वजन १५ किलो किंमत रुपये ३००० , मास कापण्याच्या दोन सुऱ्या व एक कुन्हाड किंमत ५० रुपये, एक लाकडी गोलाकार ओंडका किंमत ५० रुपये व इतर किरकोळ वस्तू असा एकूण ३१०० रुपयाचा माल जप्त करून संशयित आरोपी अफजल करीम शेख यांच्या विरूद्ध यावल पोलीस स्टेशनला भाग ५ गु. र.नं. १३२ / २०२० भा.द.वी. कलम ४२९ सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ कलम ५,६,९ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम ११९ प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या आदेशान्वये सहाय्यक फौजदार नेताजी पंडित वंजारी हे करीत आहेत.







