मुंबई (वृत्तसंस्था) – राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा यांच्या आई शारदाताई अंकुशराव टोपे यांचे शनिवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्या गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. त्या 74 वर्षांच्या होत्या. जवळपास गेल्या दीड महिन्यापासून त्यांच्यावर बॉम्बे रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. पण अखेर उपचारादरम्यानच शारदाताईंनी अखेरचा श्वास घेतला.

मातोश्री शारदाताई अंकुशराव टोपे (वय ७४) यांचे आज रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर गेल्या महिन्याभरापासून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्यावर दि.२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ पार्थपूर ता. अंबड जि. जालना येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. करोना पार्श्वभूमीवर अंत्यसंस्कार होत असल्याने करोना संबंधीच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाणार आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
राजेश टोपे यांनी ट्विटरद्वारे आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. ते म्हणाले, ती अजातशत्रु होती. एका शब्दानेही तिने कुणाला दुखावलं नाही. सर्वांना प्रेम दिले. माझ्या वडिलांच्या सोबत ती सावली सारखी राहिली. ४ वर्षांपूर्वी वडिल गेल्यानंतर ती आधार होती. दोन दिवसांपूर्वी तिने माझ्या पाठीवर दोन्ही हात ठेवत मला आर्शिवाद दिले. तो आशिर्वाद आता कायम माझ्या पाठीशी राहील, असे भावनिक ट्विट त्यांनी केले आहे.
दरम्यान, राजेश टोपे यांच्या आईचे वृत्त कळताच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.







