हिंगोणा ता यावल (प्रतिनिधी) – येथुन आठ किःमीं,अंतरावर मोर मध्यम प्रक्ल्प आहे, तसेच मोर धरणाचे पाणी पाटचाऱ्या मध्ये सोङण्यासाठी सपूर्ण यावल तालुक्या पर्यंत शेतकऱ्यांना व काही गावांना पीण्यासाठी पाणी मीळावे या उद्देशाने सन.१९७८ ते १९८० साली पाट बनवण्यात आला होता व त्यावेळचे जिल्ह्याचे प्रसिद्ध ठेकेदार गोलाणी ब्रदर्स ली.यांनी हा ठेका घेतला होता बरीच वर्षे या पाटाचे खोदकाम व बांधकाम चालले होते.

कारण त्यावेळी जे.सी.बी.सारखी अद्यावत मशीनरी नव्हती तर हजारो मजुरांनी मेहनतीने हा पाट तयार केला होता व खुप माजबुत असे हे काम होते कारण पाट तयार होऊन ४० वर्षे झालीत परंतु अद्याप या पाटाची कोणतीही मोठी दुरूस्ती पाटबंधारे विभागाला करावी लागली नाही तसेच या पाटचारीवर ठीकठीकाणी कर्मचारी ही ठेवण्यात आले होते ते आज दिसतच नाही तर रब्बी व खरीप पिकांनसाठी शेतकरी पाटबंधारे विभागात जाऊन शासकीय फी भरून किर्लोसकर कंपणीचे डीझेल मशीन पाटावर बसवून आपल्या शेतात पिकांना पाणी देत होता व प्रत्येक १५ दिवसांच्या अंतराने पाटाला पाणी सोडले जात होते मात्र आज परीस्थीती विपरीत असुन पाटाला पाणी केंव्हा येईल हे फक्त पाटबंधारे विभागाच्या आधीका-यांनाच माहीत असते व वेळेवर पाटाला पाणी येत नसल्याने शेतकरी फाँर्मही भरत नाही व पाटाचे पाणीही वापरत नाहीत तसेच पाटबंधारे विभागाचा एकही कर्मचारी पाटावर दिसत नसून पाटाच्या आजुबाजुला मोठमोठ्या झुडपांची गर्दी झाली असुन ती झुडपे काढण्यासाठी पाटबंधारे विभाग कोणतीही उपाययोजना करीत नसल्या मुळे मजबुत बांधकाम असलेल्या या पाटाच्या आजुबाजुला असलेल्या झुडपांच्या मुळांनी मोठ मोठे तडे पडलेली आहेत मात्र सुस्त असलेले यावल पाटबंधारा विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहेत.







