यावल (प्रतिनिधी) – येथे आज १ ऑगस्ट महसुलदिना निमित महसुल मध्ये उत्कृष्ठसेवा देणाऱ्या रावेर व यावलच्या महसुल अधिकारी व कर्मचारी यांना सन्मान पत्र देवुन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रावेर मतदार संघाचे आमदार शिरिषदादा चौधरी , कार्यक्रमाचे अध्यक्ष अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन , फैजपुर उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले , यावल तहसीलदार जितेन्द्र कुवर , रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे , सौ.सुप्रिया थोरबोले यांच्या प्रमुख उपस्थितीत यावल व रावेर महसुल मध्ये उत्कृष्ट सेवा देणाऱ्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मानपत्र देवुन गौरविण्यात आले.
दरम्यान यावल तहसील कार्यालयाच्या आवारात आज १ ऑगस्ट महसुल दिना निमित आयोजीत कार्यक्रमात यावल व रावेर या दोन्ही तालुक्यातील महसुल विभागाचे यावलचे तहसीलदार जितेन्द्र कुवर व रावेरच्या तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्यासह महसुलचे आधिकारी, कर्मचारी व पोलिस पाटील असे एकूण २२ जणाना आपल्या उत्कृष्ट सेवेबद्दल सन्मान पत्रा द्वारे गौरविण्यात आले यात सुरेश रामदास तायडे ( कोतवाल चिखली बु.यावल), महेंद्र उल्हास चौधरी (कोतवाल मस्कावद रावेर ) ,बाळु काळु पाटील ( शिपाई यावल ), सुनिल मधुकर सोनार (शिपाई रावेर ) ,योगेश भागवत केदारे (शिपाई फैजपुर प्रांत. ) , हिरामण माणिक सावळे ( वाहन चालक यावल ), अशोक रघुनाथ पाटील (पोलीस पाटील गिरडगाव ता.यावल ), योगेश पाटील ( पोलीस पाटील निंबोल ता. रावेर ) , कलेश डी हातकर ( संगणक सहाय्यक वनजमीनी प्रांत कार्या. फैजपुर ), श्रीमती लिना कुंदन राणे ( तलाठी न्हावी यावल ) , दादाराव विठ्ठलराव कांबळे (तलाठी रावेर ), सुयोग दिलीप पाटील ( लिपीक यावल ) , शिवकुमार लोलपे ( लिपीक रावेर ) , अमोल वासुदेव चौधरी ( लिपीक प्रांत कार्या. फैजपुर ) , पाटीलबा दाजीबा कडनोर( मंडळ अधिकारी साकळी ता.यावल ) , प्रमोद भगवान टोंगळे ( मंडळ अधिकारी ऐनपुर ता.रावेर ), रविंद्र भगवान मिस्तरी ( इंगायो अव्वल कारकुन,यावल ) , हर्षल विश्वनाथ पाटील ( पुरवठा निरिक्षक रावेर ), रशीद आय तडवी ( अव्वल कारकुन प्रांत कार्या. फैजपुर ), राहुल बी सोनवणे (निवडणुक नायब तहसीलदार यावल), संजय उर्खड्ड तायडे ( निवासी नायब तहसीलदार रावेर ), महेश यशवंत साळुंके (नायब तहसीलदार प्रांत कार्या. फैजपुर ) यांचा उत्कृष्ट सेवाकर्मी म्हणुन यात समावेश करण्यात येवुन आज गौरवण्यात आले आहे कार्यक्रमाचे प्रस्तावीक यावल तहसीलदार जितेन्द्र कुवर यांनी केले तर पाहुण्याचा परिचय व सुत्रसंचलन जे.डी. भंगाळे यांनी केले.










