विशाखापट्टणम (वृत्तसंस्था) – येथील हिंदुस्थान शपयार्डमध्ये क्रेन कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली असून यामध्ये १० जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. याबाबतचा व्हिडीओ एएनआय या नामांकित वृत्तसंस्थेने ट्विट केला असून यामध्ये ही महाकाय करेन कोसळतानाचे दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शिपयार्डमध्ये क्रेनच्या दुरुस्तीचे काम सुरु होते. मात्र काही अधिकारी व कर्मचारी क्रेनची पाहणी करण्यासाठी गेले असता ही क्रेन कोसळली. यामध्ये खाली उभा असलेल्या १० जणांना आपले प्राण गमवावे लागलेत.
याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, या भीषण दुर्घटनेत अनेक लोक सापडले त्यापैकी १० जणांचा जागीच मृत्यू झाला. यातील जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत सहा मृतदेह या क्रेनखालून बाहेर काढण्यात यश आले आहे. डीसीपी सुरेशबाबू यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.







