नवी दिल्ली(वृत्तसंस्था)- : देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकारने इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (सीबीडीटी) हा निर्णय आज ट्विटद्वारे जाहीर केला आहे. यामुळे करदात्यांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. याआधी इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै होती.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर करदात्यांना दिलासा देण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने २०१८-१९ (असेसमेंट इयर २०१९-२०) या आर्थिक वर्षांसाठी इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची तारीख ३१ जुलैवरून वाढवून ३० सप्टेंबर केली आहे. आयकर विभागाने या संदर्भातील माहिती दिली आहे.
आतापर्यंत नवे आणि रिवाईज्ड इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख तिसऱ्यांदा वाढवली आहे. सर्वांत आधी रिटर्न दाखल करण्याची तारीख ३१ मार्च होती. त्यानंतर ती वाढवून अनुक्रमे ३० जून, ३१ जुलै करण्यात आली होती आणि ती पुन्हा वाढवून ३० सप्टेंबर करण्यात आली आहे.








