नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रामलला मंदिराचा पायाभरणीसाठीच्या दौऱ्यास लोकसभेचे खासदार असादुद्दीन ओवैसी यांनी विरोध दर्शविला आहे. पंतप्रधान मोदींनी रामलला मंदिरासाठी अयोध्या दौरे करणे ही पंतप्रधानांच्या घटनात्मक शपथाचे उल्लंघन असल्याचे ओवेसी म्हणाले. धर्मनिरपेक्षता हा देशाच्या घटनेचा महत्त्वाचा भाग आहे.

५ ऑगस्टला राम मंदिराचा भूमिपूजन कार्यक्रम होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने राम मंदिर चळवळीशी संबंधित अनेकांना आमंत्रित केले आहे परंतु कोरोना विषाणूच्या साथीमुळे लोकांची संख्या २०० पर्यंत मर्यादित केली आहे.
एआयएमआयएमचे अध्यक्ष असादुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधानांच्या दौर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून ते म्हणाले की रामलला मंदिराच्या भूमिपूजनामध्ये पंतप्रधानांचा सहभाग हा त्यांच्या घटनात्मक पदाच्या शपथविधीचे उल्लंघन असू शकते. धर्मनिरपेक्षता हा आपल्या राज्यघटनेच्या मूलभूत रचनेचा भाग आहे, असे ओवेसी यांनी ट्विट केले.







