मुंबई (वृत्तसंस्था) – मराठा आरक्षणावर आज सर्वोच्च न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. यावेळी सुनावणी होईपर्यंत नोकर भरती करु नये, असे सांगत न्यायालयाने सांगितले असून याचिकांवर १ सप्टेंबरपासून प्रत्यक्ष सुनावणी घेण्याचा निर्णय आज दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश एल. एन. राव यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. आजपासून मराठा आरक्षणावर नियमित सुनावणी करण्यात येणार आहे. यावेळी राज्य सरकारने हा खटला पाच न्यायमूर्तींच्या खंठपीठाकडे देण्यात यावा, अशी मागणी केली. या मागणीवर २५ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे न्यायालयानं वैद्यकीय प्रवेशासंदर्भात कोणतीही स्थगिती दिलेली नाही.
मराठा आरक्षणासंदर्भातील या याचिकांवरील सुनावणी होईपर्यंत नोकरी भरती न करण्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने विचारणा असता करोनाच्या काळात नोकर भरती न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे.